प्रज्ञा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी : या वर्षी मोठ्या प्रमाणात बँक भरती होणार असुन भारतीच्या तारखा तसेच केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या भरतीच्या तारखा जाहीर झाल्या असून त्या निमित्त रविवार दि. ८ मे रोजी सकाळी ११ वा. प्रज्ञा कॅडमी, -03, साई माऊली, हॉटेल अल्फा जवळ, हेळेकर स्वीटमार्ट मागे, जुना माळनाका, रत्नागिरी येथे मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या सेमिनारमध्ये भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याच्या तारखा, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरुप, निवड प्रक्रिया आदीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी पदवीधर विद्यार्थी तसेच कॉलेज करणार्या विद्यार्थ्यांनी या सेमिनारला शक्य झाल्यास पालकांसह उपस्थित राहावे. तसेच आपल्या भागातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यां पर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर मोरे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 8552010041 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
