बारावी परीक्षेत यंदाही कोकणच अव्वल!
कोकण बोर्डाचा निकाल ९७.२१ टक्के
कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या वर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 97.21 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. . राज्याचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. बोर्डाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी परीक्षा आणि निकाल यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, यावर्षीही निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.