बीपीसीएलच्या जेएनपीटी युनिटमधील कामगार अन्यायाच्या विरोधात आक्रमक
उरण (विठ्ठल ममताबादे ) : बीपीसीएल ही राष्ट्रीय कंपनी उरण मध्ये भेंडखळ येथे कार्यरत असून या कंपनीचे एक यूनिट जेएनपीटीमध्ये कार्यरत आहे. या यूनिट अंतर्गत उरण मधील स्थानिक भूमीपुत्र मराठी कामगार काम करीत असून एकूण 25 ते 30 युवक येथे काम करीत आहेत. मात्र गेली 5,6 महिन्यापासून या कामगारांवर ठेकदारा मार्फत वेगवेगळे अन्याय सुरू आहेत.
कामगारांना कधीही वेळेवर पगार मिळत नाही. ESIC व इतर सेवा सुविधा मिळत नाही. तसेच कामगारांना वेळेवर सुट्टया मिळत नाही. तसेच ठेकेदाराने कामगारांना किंवा कामगारांच्या -प्रतिनिधींना न कळवता डायरेक्ट पगारातून 2650 रुपये कमी केले आहेत. तसेच कामगारांना हाउस किपींगचे काम सांगितले जाते. वास्तविक सदर कामगार BPCL यूनिटचे ऑईल, तेल तसेच इतर रासायनिक द्रव्ये वाहनावर चढविणे, उतरविणे तसेच इतर तत्सम कामे करतात.त्यांना हाउस किपींगचे कामे सांगणे चुकीचे आहे असे कामगारांचे म्हणणे आहे. तसेच ठेकेदार अधून मधून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतात.असे कामगारांनी सांगितले.अचानक 3 कामगारांचे पास रद्द केल्याने कामगार वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे, सर्व कामगार यांनी JNPT BPCL Liquid jetty चे मुख्य अधिकारी बि रमेश यांची भेट घेतली असता त्यानी आपले हात वर केले आणी सांगितले की आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. आम्ही काहीही करू शकत नाही.शेवटी सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शेवटी लीली या कॉन्ट्रॅक्ट संस्थेचे ऑरडिनेटर श्रीधर मंतीना, BPCL जेटटीचे साईड इन्चार्ज व्ही. पी सर्वानन यांनी कामगारांची भेट घेतली व कामगारांना कामावर रुजू होण्यास सांगितले. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंदचा निर्णय कामगारांनी घेतला. BPCL भेंडवळ येथील प्रशासन तसेच जेएनपीटी मधील BPCL च्या यूनिट प्रशासन सुद्धा सदर कामगारांना कोणतेही सहकार्य करित नसल्याचे कामगारांनी आरोप केला आहे. को ओरडीनेटर श्रीधर मंतीना यांना विचारले असता कामगारांना प्रश्न सोडविण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही तर साईड इन्चार्ज व्ही पी सर्वनन यांनीही कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले नाही. सी आय एस एफ चे अधिकारी मणीभारती यांनी मध्यस्थी केल्याने 7 दिवसांनी सर्वांनी एकत्रित मिटिंग घेण्याचे मान्य केले. त्यानंतर कामगारांनी कामावर जाण्याचे मान्य केले.मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा कामगारांचे नेते एस.मिश्रा यांनी दिला आहे.
कामगारांचे कोणतेही मागण्या लिली या कॉन्ट्रॅक्ट संस्थेने आजपर्यंत मान्य केले नाही. उलट कामगारांनाच त्रास देणे सुरु आहे. कोणतेही शिवीगाळ केले नसतानाही ठेकेदारांनी कामगारांचे नेते एस.मिश्रा यांच्यावर शिवीगाळ केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर लो