Ultimate magazine theme for WordPress.

बेस्ट अ‍ॅक्टर आनंद भरत ठक्कर ‘रायगड रत्न’ पुरस्काराने सन्मानित

0 46

उरण (विठ्ठल ममताबादे):
कै. भिकाजी गोविंद तांबोटकर यांच्या स्मरणार्थ जायंट्स ग्रुपतर्फे रायगड जिल्ह्यातील होतकरू कलाकारांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम उरणमधील अंगण लॉन, चिंबलथळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या वेळी उत्कृष्ट गायक सागर म्हात्रे, उत्कृष्ठ स्वीमर रुद्राक्ष टेमकर, उत्कृष्ट बेस्ट अ‍ॅक्टर आनंद ठक्कर यांना ‘रायगड रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे एन सी एफ-उपेंद्र मेणन, एन सी एफ -ललिथा वासन, फेडरेशन प्रेसिडेंट -महेंद्र बांठीया, ब्रँच ऑफिसर चार्ज -टी डी थॉमस, अशोक शहा, नरेश दप्तरे आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड रत्न पुरस्कार मिळाल्याने सुप्रसिद्ध गायक सागर म्हात्रे, उत्कृष्ट ऍक्टर आनंद ठक्कर, बेस्ट स्विमर रुद्राक्षी टेमकर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियवंदा तांबोटकर यांनी तर आभार प्रदर्शन रोशनलाल मेहता यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.