Ultimate magazine theme for WordPress.

भंगार व कचरा गोळा करणाऱ्या अश्रफ व अमित यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

0 29


सापडलेल्या रोख रकमेसह सामान केले परत

उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणाऱ्या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरण मध्ये घडली आहे.आजही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण सर्वांना एकदा अनुभवास मिळाले.
सविस्तर घटना अशी की 7 मे रोजी मासेमारी व्यवसाय असणाऱ्या करंजा कासवले पाडा येथील रहिवासी 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी धनंजय नाखवा हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांची अँक्टीव्हा मोटार सायकल घेऊन ते करंजा कासवले पाडा ते नाखवा हाॅस्पीटल, कोटनाका येथे जात असताना त्यांच्या जवळ असलेल्या काळया रंगाच्या पर्स मध्ये 10 हजार रुपये रोख रक्कम, विवो कंपनीचा मोबाईल फोन व मुलीच्या औषधोपचारा करीता पैसे कमी पडत असल्याने सोनाराकडे गहाण ठेवण्याकरीता सोबत ठेवलेले साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसुत्र असे आनंदी हाॅटेल जवळ आले असता रस्त्यात पडुन गहाळ झाले. 
ही पर्स परत मिळावी या करिता तक्रार देण्यासाठी त्या उरण पोलीस ठाणे येथे आल्या. त्यावेळी उरण पोलीस ठाणे येथे रस्त्यावर भंगार व कचरा गोळा करणारे अश्रफ असगर शेख वय 18 वर्ष व अमित लालजी चौधरी, वय 23 वर्ष दोन्ही रा.बोरी पाखाडी हे उरण पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आंनदी हाॅटेल जवळील पेट्रोल पंपसमोरील रस्त्यावर सापडलेली काळया रंगाची पर्स व त्यात असलेले सोन्याचे मंगळसुत्र, 10 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन मुळ मालकाला परत मिळावा या करिता त्यांना मिळालेली पर्स ते जमा करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले.
यावेळी त्यांनी जमा केलेली पर्स सुशाली नाखवा यांना दाखवुन व खात्री करून या प्रकरणी पोलीस ठाण्यात आलेल्या अश्रफ असगर शेख व अमित लालजी चौधरी यांना सुशाली नाखवा यांच्या समोर हजर केले. या दोघांनी प्रमाणिकपणे रस्त्यावर सापडलेली काळया रंगाची पर्स व त्यातील 10 हजार रुपये रोख रक्कम, विवो कंपनीचा मोबाईल फोन व साडे तीन तोळ सोन्याचे मंगळसुत्र हे सुशाली धनंजय नाखवा यांना परत करुन उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करत माणुसकीचे दर्शन घडविले.
आजच्या स्वार्थी दुनियेतही दाखविलेल्या माणुसकी मुळे, प्रामाणिकतेमुळे  उरण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या टीम ने अश्रफ असगर शेख, अमित लालजी चौधरी यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.