Ultimate magazine theme for WordPress.

भारत शिक्षण मंडळाच्या व्यवसायाभिमुख कौशल्यविकास केंद्राच्या पहिल्या बॅचचे प्रमाणपत्र वितरण

0 47


रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळातर्फे दि.१९ जुलैला विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते व्यवसायाभिमुख कौशल्यविकास केंद्राच्या पहिल्या बॅचचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.पदवी अभ्यासाबरोबरच कौशल्य विकास कोर्सेसची नितांत गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांनी असे कोर्सेस करावेत याचे महत्व देखील विद्यार्थ्यांना डाॅ.जाखड यांनी सांगितले. 
भारत शिक्षण मंडळामध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये व्यवसायाभिमुख कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. या केंद्रांतर्गत २१ विविध कोर्स पैकी सुरुवातीला ७ कोर्स सुरू केले होते. त्यामध्ये टॅली, फॅशन डिझाइनींग, आय.बी.पी. एस. प्रमाणे बॅकिंग क्षेत्रातील परीक्षांचा अभ्यास,स्पीकिंग इंग्लिश कोर्स, बेसीक इंग्रजी ग्रामर, ॲडव्हान्स इंग्रजी ग्रामर, व्यक्तीमत्व विकास, आय सी टी टुल्स, कॉम्पूटर अकाउंटींग हे कोर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच याही वर्षी हे प्रमाणपत्र कोर्स १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहेत. यामध्ये वरील कोर्सबरोबरच परकीय भाषा – जापनीज् व पॉटरी हे नवे दोन कोर्स सुरू करित आहोत. या सर्व व्यवसायाभिमुख कौशल्य विकास कोर्सेसना विद्यार्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या कोर्सेस तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक घेत आहेत. 
कार्यक्रमाला देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, भारत शिक्षण मंडळाचे सदस्य राजेंद्र कदम, इतर पदाधिकारी ,उपप्राचार्या व व्यवसायाभिमुख कौशल्य विकास केंद्राच्या समन्वयक सौ.वसुंधरा जाधव, सीए प्रसाद दामले, महाविद्यालयाचा संपूर्ण शिक्षक वृंद, तिन्ही शाखेचे सर्व विद्यार्थीवर्ग, ॲड ऑन चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन परीक्षा विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड यांनी केले, बक्षिसे व प्रमाणपत्र वितरण प्रा. विनय कलमकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव घाणेकर यांनी केले तर आभार प्रा. वैभव कीर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.