https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मढवी दांपत्याकडून वटवृक्ष रोपण करुन वटपौर्णिमा साजरी

0 44

उरण (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू पंचागांतील जेष्ठ महिण्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा सर्वत्र साजरी होत असते. आणि म्हणून गतवर्षाप्रमाणे वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी आणि त्यांच्या सौभाग्यती यांनी उलवे येथे वटवृक्ष रोपन करुन वटपौर्णिमा साजरी केली.काही दिवसातच मुबंई महानगरपालिकेने वडाच्या फांद्या तोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. ह्याच दुरदृष्टीच्या विचाराने कार्यरत असलेले समाजसेवक किरण मढवी यांनीही उलवे येथील वटसावित्रींवर वडाच्या फांद्या तोडून वटपौर्णिमा साजरी करण्याची वेळ येवू नये यासाठी सिडको प्रशासनास उलवे शहरात वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वटवृक्ष लागवडीची एका वर्षापूर्वीच मागणी केली आहे.वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आपल्या हिंदू सणात आवश्यक असलेले महत्वाच्या वृक्षांचे रोपन करणे ही काळाची गरज असल्याने किरण मढवी यांची वटवृक्ष सामाजिक संस्था ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे.किरण मढवी यांनी स्थापन केलेल्या वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर वृक्षारोपण व त्याचे संगोपणाचे कार्य सुरु असतात.वटपौर्णिमा निमित्त वटवृक्ष रोपन करुन उलवे येथील मढवी दांपत्यांनी समाजात आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.