स्लीपर श्रेणीतील एक डबा कायमस्वरूपी वाढवला
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस आता तेवीस रुपयांची धावणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे या गाडीला स्लीपर श्रेणीतील एक डबा कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी मंगळूर सेंट्रलहुन 2 जूनला करण्यात आली असून लोकमान्य टिळक टर्मिनस वरून तीन जूनपासून करण्यात येणार आहे