https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मनसेचे राजेश कोळी यांना बँकॉक येथून पीएचडी

0 58

उरण (विठ्ठल ममताबादे ) : बेलपाडा गावचे सुपुत्र तथा मनसेचे कट्टर कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते राजेश अनंत कोळी यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कॉमनवेल्थ होकेशनल युनिव्हर्सिटी, मकाऊंगा, हाहाके, टॉंगतापू, किंगडम ऑफ तोंगा तर्फे राजेश अनंत कोळी यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 25 जून 2022 रोजी बर्कले हॉटेल, प्रतूनम, बँकॉग, ठायलंड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

राजेश अनंत कोळी हे मनसेचे कट्टर एकनिष्ठ कार्यकर्ते असून राज ठाकरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. मनसे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष, मनसे पर्यावरण सेना राज्य उपाध्यक्ष, मनसे शिक्षक सेना राज्य चिटणीस आदी विविध 29 राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पदावर ते कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी अनमोल रतन, समाज भूषण आदी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मनसेचे राजेश कोळी यांना थायलंडमधील कॉमनवेल्थ होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.