उरण दि 16(विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 16 जून 2022 रोजी आवरे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, उरण तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, पूर्वविभाग प्रमुख दिपक पाटील आणि आवरे मनसे उपाध्यक्ष अनिल गावंड, शाखा अध्यक्ष रत्नाकर गावंड उपस्थित होते.शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि मुख्याध्यापक सुधीर वारलकर आणि शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष राजेश गावंड तसेच आवरे गावातील सर्व मनसैनिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |