मल वाहिन्यातील मल नि: स्सारण केंद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी संयोजन युनिटची व्यवस्था करा
द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेची मागणी
उरण (विठ्ठल ममताबादे) : सिडकोने उरण तालुक्यात द्रोणागिरी शहर वसविले द्रोणागिरी शहर विकसित होत असल्याने मुंबई पुणे, नाशिक पश्चिम महाराष्ट्र आदि भागातील नागरिक येथे मोठ्या संख्येने घरे -घेत आहेत.येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरीकरण जोरात सुरू आहे. मात्र सिडकोचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.
द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी मलवाहिन्यातील मल निस्सारण केंद्रापर्यत वाहून नेण्यासाठी संयोजन यूनिटची व्यवस्था करावी, अशी मागणी सिडकोकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. सिडकोने विकासकाला रहिवाशांचा ना हरकत दाखला देताना सेप्टीक टँकची साफसफाई करण्याची अटी व शर्ती घातल्या आहेत. परंतु आजतागायत कुठल्याही विकासकाने सेफ्टीक टँकची साफसफाई केली नाही.ही साफसफाई येथील रहिवाशानांच करावी लागते. रहिवाशांना साफसफाई खर्च तसेच सिडको आकारत असलेला विकासाचा खर्च असा दोन्ही खर्च उचलावा लागतो.परिणामी बरेचसे रहिवाशी सेप्टीक टँकच्या साफसफाईचा खर्च देत नाहीत. परिणामी विकासक आणि रहिवासी यांच्या वाद होतात व सेप्टीक टॅंक साफसफाई करायची तशीच राहून जाते. त्यामूळे अनेक ठिकाणी रहिवाश्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल ११ ते १२ वर्षे झाली पण मला निस्सारण जोडणीचे कोणतेही काम झालेले दिसत नाही. अशा परिस्थितीत विकासक सेप्टीक टँकची साफसफाई करत नाहीत. अशा परिस्थितीत रहिवाशांना हा खर्च कारण नसताना सोसावा लागतो. मलनिस्सारण केंद्र निर्माण करून कार्यान्वित करण्याची काल मर्यादा ठरलेली आहे.
सिडकोने निविदा प्रक्रियेत सुद्धा ही काल मर्यादा ठरवलेली आहे मल निस्सारण केंद्र होईपर्यंत सेप्टीक टँकच्या साफसफाईचा खर्च कराराप्रमाणे विकासकाने करणे समजू शकतो परतू वर्षानुवर्षे न सुटलेला मल निस्सारणाच्या प्रश्नामुळे रहिवाशांना त्रास देणे कितपत योग्य आहे. असा सवाल सिडकोला केलेल्या पत्रव्यवहारातून शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी उपस्थित केला आहे. कोणताही वेळ न घालविता मल वाहून नेण्यासाठी संयोजन यूनिटची सेवा तातडीने पुरवावी अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी सिडकोला केले आहे.