Ultimate magazine theme for WordPress.

‘महंगाई पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत काँग्रेसने जाणून घेतल्या सर्वसामान्यांच्या भावना

0 38

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महंगाई पे चर्चा हा कार्यक्रम राबविण्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली  उरण शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण शहरातील बाझारपेठेत जाऊन सर्वसामान्य फळविक्रेते, व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या महागाई बाबत भावना जाणून घेतल्या.

यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी सध्याच्या वाढती महागाई विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. व वाढत्या महागाईचा आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला. आम्हाला सर्वसामान्यांचे सरकार पाहिजे. आम्हाला रोजगार देणारे सरकार पाहिजे, आम्हाला महागाई कमी करणारे सरकार पाहिजे. गोरगरिबांना जगविणारे आम्हाला सरकार पाहिजे असे वेगवेगळे मत व्यावसायिक, व्यापारी, फळविक्रेते, भाजी विक्रेते, सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महंगाई गाई पे चर्चा या कार्यक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना, व्यापारी, व्यावसायिक भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांना काँग्रेसचेच सरकार पाहिजे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.
या महागाई पे चर्चा कार्यक्रम प्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शाकीर शेख,तालुका सेवा दल अध्यक्ष कमलाकर घरत,शहर उपाध्यक्ष मोहनसिंह खरवड, जेष्ठ कार्यकर्ते सुनील काठे, शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, शहर महिला उपाध्यक्ष चंदा मेवाती, कार्यकर्ते – दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.