महामार्गावर हातखंबा येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक जखमी
नाणीज : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा निवळी नजीक रिलायन्स पंपासमोर आयशर टेम्पो व दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीचा चालक जखमी झाला. गुरुवारी मध्यरात्री 1.40 हा अपघात झाला.
हातखंब्यानजीक आयशर टेम्पो क्रमांक एमएच04-एसडी 1268 वर समोरील दुचाकी क्रमांक एमएच 08- वाय क्यू-4151 यांची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीस्वार गंभीरजखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागला ट्रकच्या पुढील टायरखाली दुचाकी गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील म्बुलन्स ने तात्काळ रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे सोडले व त्यांचे प्राण वाचले. जखमीचे नाव तेजस विष्णू रामगडे (21. रा. करबुडे रत्नागिरी) असे आहे.