मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांनी इंधनावरील VAT कमी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसातच त्याची अंमलबाजवणी होण्याचे संकेत मिळाले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर लागणारा व्हॅट कमी करण्याची मागणी सातत्याने होत होती. राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेनंतर या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच राज्यातील पेट्रोल-डिझेलसह सीएनजीचे दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाले तर राज्यातील जनतेसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.
