उरण (विठ्ठल ममताबाद) : केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य,जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संख्या पनवेल, डाबर इंडिया लिमिटेड, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, महाराष्ट्रभूषण राजू मुंबईकर व सामाजिक कार्यकर्ते रोशन पाटील यांचा वाढदिवस उरण व पनवेल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला
दिनांक 23/7/2022 रोजी पाले येथे दप्तर बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप , सारडे जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, गावठाण येथील शाळेत LED TV व खाउ वाटप,केळ्याचा माळ येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, पुनाडे, वेश्वि वाडी,वेश्वी गाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप. सारडे येथे डोंगरावर वृक्षारोपण. निफाडवाडी पेण येथे आदिवासीना ज्यूस शॅम्पू हॅन्डवाश वाटप तर दिनांक 24/7/2022 रोजी I Love वेश्वीवाडी बोधचिन्हाचे लोकार्पण, वेश्वि येथे रॉक अँनिमल पार्क मध्ये प्राणी व पक्षांच्या पुतळ्यांचे अनावरण. 500 झाडांचे वृक्षारोपण, सारडे येथे LED TV वाटप. विंधणे येथील आदिवासी वस्तीगृहात वॉटर फिल्टर व शैम्पू वाटप.रानसई आदीवासी वाड्यावर, जिल्हा परिषद शाळा रानसई येथे शैक्षणिक साहित्य वाटप व हेन्डवाश ज्यूस वाटप जेवण, पिरकोन फणसवाडी येथे मैत्री कट्टा व निवारा शेडचे लोकार्पण, I LOVE सारडे बोधचिन्हाचे लोकार्पण, चिरनेर आदिवासी आश्रम शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व जेवण, करुणेश्वर वृद्धाश्रम (पनवेल) येथे आजी आजोबांना कपडे व ब्लॅंकेट वाटप,बंगल्याची वाडी,मार्गाची वाडी,सांगवाडी,खोदयाची वाडी,खैरकाठी वाडी,भुऱ्याची वाडी,वेश्वि आदिवासी वाडी या वाड्यात हँडवॉश,शाम्पू,मध आणि जूसचे वाटप करण्यात आले.असे अनेक विविध सामाजिक उपक्रम उरण व पनवेल तालुक्यात राबविण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, साई मंदिर वहाळचे संस्थापक तथा प्रसिद्ध समाजसेवक रविशेठ पाटील , सुभाष भोपी, रिटघरचे माजी सरपंच भारत भोपी, रोहन पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी महेंद्र मुंबईकर, कॉन संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर,उपाध्यक्ष संदेश घरत,संपेश पाटील, नवनीत पाटील , आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर ,क्रांती म्हात्रे, हरेश गावंड,माजी सरपंच नरेंद्रशेठ मुंबईकर,पिरकोनचे सरपंच रमाकांत जोशी, मिलन म्हात्रे , महेंद्र पाटील , सुभाष पाटील , वेश्वीचे सरपंच संदिप कातकरी व सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.एकंदरीतच मोठ्या उत्साहात राजू मुंबईकर व रोशन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.