मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी आवाहन
रत्नागिरी : सन 2022-23 साठी मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. मागासवर्गीय गरजू विद्यार्थी, विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल, अधिक्षिका व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी (02352-230957) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एस.एस.चिकणे, सहायक आयुक्त समाजकल्याण, रत्नागिरी यांनी केले आहे.