माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा मेळावा रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्रवीर सावरकर विद्यालय, नवीन शेवा येथे आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते अवजड वाहतूक सेनेचे उरण तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना पागोटे शाखेच्या वतीने श्री गणेश उत्सव साठी छापण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी एन डाकी,गटनेते गणेश शिंदे,महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, ज्योती म्हात्रे,उपसभापती हिराजी घरत, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, जयवंत पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, शिक्षक नेते नरेश मोकाशी,विधी सेलचे अध्यक्ष ऍड.मछिंद्र घरत, उपतालुका संघटक के एम घरत, विभागप्रमुख रजनीकांत पाटील, एस के पुरो, वैशाली सुतार व मयुरी घरत हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर वेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, उपाध्यक्ष कुणाल पाटील, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर शिवसेना पागोटे शाखेचे रमेश पाटील, अरुण पाटील,माजी शाखाप्रमुख अनिल पाटील, गावाचे उपाध्यक्ष धीरज पाटील, शाखाप्रमुख महेंद्र पाटील, उपशाखाप्रमुख महेश पाटील, मनोहर तांडेल, दीपक पाटील, प्रदीप पाटील, विनय पाटील, प्रणय पाटील, शुभम पाटील, विशाल पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, दौलत पाटील, अरूण चंद्रकांत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. भाविक भक्तांना गणेश देवता व इतर देवतांची आरती करण्यासाठी उपयुक्त असे आरती संग्रह पुस्तक असून याचा फायदा धार्मिक कार्यक्रमात आरती गाताना होणार आहे.सुदंर व सर्व देवतेचे आरती असल्याने उपस्थित सर्वांनी, मान्यवरांनी अवजड वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील, शिवसेना शाखा पागोटे व सदर आरती पुस्तकाचे कौतुक केले.