Ultimate magazine theme for WordPress.

माधवबागच्या रत्नागिरी युनिटचा नववा वर्धापन दिन साजरा

0 33

अनेकांकडून माधवबागच्या वाटचालीला शुभेच्छा!

रत्नागिरी : माधवबाग या भारतातील अग्रगण्य हार्ट केअर नॉन सर्जिकल मल्टी डीसीप्लीनरी क्लिनिक व हॉस्पिटलच्या रत्नागिरी शाखेने आपला ९वा वर्धापन दिन साजरा करताना दहाव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्त रुग्णालयच्या युनिट हेड डॉ. मृदुला गुजर तसेच डॉ. महेश गुजर यांना अनेकांनी शुभेच्छा देत माधवबागच्या रुग्णसेवेची प्रशंसा केली.

माधवबाग ही भारतातील अग्रगण्य हार्ट केअर नॉन सर्जिकल मल्टी डीसीप्लीनरी क्लिनिक व रुग्णालय साखळी. ज्यांनी प्राणघातक अशा हृदयरोगाला सफलतेने पराभूत केले आहे. इथे आधुनिक पद्धतीने वैद्यकीय तपासण्या व आपल्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा- आयुर्वेद यांच्यासोबत रिसर्च बेस्ड  आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोगाची यशस्वी चिकित्सा केली जाते.
माधवबागचा पाया सुप्रसिद्ध वैद्य माधव साने यांनी रचला. वैद्य माधव साने यांच्या ज्ञान व अनुभवाचा वारसा पुढे नेला तो त्यांच्या मुलाने म्हणजेच डॉक्टर रोहित साने यांनी. डॉक्टर रोहित साने यांनी ॲडव्हान्स आयुर्वेदावर रिसर्च करून कॉपीराईटेड हार्ट केअर ट्रीटमेंट डिझाईन केली व भारतातील पहिल्या आयुर्वेदिक कार्डियाक rehabilitation सेंटरची स्थापना केली. आजमितीला भारतातील अनेक ठिकाणी दोनशेहून जास्त क्लिनिक व दोन निवासी हॉस्पिटल माधवबागची आहेत.
या अंतर्गत २०१३  पासून शिवाजीनगर रत्नागिरी येथे माधवबाग क्लिनिक कार्यरत आहे. या क्लिनिकमध्ये डॉ. सौ. मृदुला गुजर व डॉ. श्री. महेश गुजर हे रुग्णसेवा प्रदान करत आहेत. २०११ पासून ते माधवबागशी संलग्न आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉ. काजल साबळे व प्रशिक्षित व अनुभवी पंचकर्म थेरपिस्ट श्री. गणेश बड़बे, श्री. मयूरेश चव्हाण व सौ. सरिता मोहिते यांच्यासह पेशंट केअर एग्झीक्यूटिव सौ. संध्या आंबेकर आणि कु. मिलन आंबेकर हे कार्यरत आहेत. यांच्यामार्फत हजारो रुग्णांना कार्डीयाक केअर सेवा उपलब्ध केली आहे. डॉ. मृदुला गुजर यांना मधुमेह नियंत्रणातील उत्कृष्ठ डॉक्टर पुरस्कार मिळाला आहे.

माधवबाग रत्नागिरी शाखा ही बेस्ट क्लिनिक, बेस्ट पेशंट केअर एग्झीक्यूटिव, बेस्ट पंचकर्म थेरपिस्ट इ. अनेक पारितोषिक प्राप्त असून रुग्ण सेवेत नेहमी अग्रेसर व तत्पर आहे.
माधवबाग- या ठिकाणी प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र व आधुनिक शास्त्राच्या संयोगाने कार्डीयक केअर ला एक नवी दिशा प्राप्त करून दिली जाते. माधवबागच्या रिसर्च पेपर्सना जगातील सर्वोत्तम मेडिकल जर्नल द लान्सेट, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, इंडियन हार्ट जर्नल द्वारा मान्यता प्राप्त झालेली आहे. माधवबाग मध्ये हार्ट- डिसीज,ब्लॉकेजेस, डायबेटिस, ब्लडप्रेशर व स्थूलता या प्रमुख आजारांवर माधवबागच्या आधुनिक पद्धतीने निदान करून त्यानंतर औषधे,पंचकर्म, डायट व आदर्श दिनचर्या या सूत्रांवर आधारित उपचार केले जातात. आपल्या कोकणातील लोकांसाठी हार्ट डिसीज, डायबेटिस, ब्लडप्रेशर यासारख्या आजारांवर विनाशस्त्रक्रिया उपचारांसाठी शिवाजीनगर रत्नागिरी येथे माधवबागची शाखा पूर्वीपेक्षा प्रशस्त जागेमध्ये व अधिक सोयींनी सुसज्ज आहे.
रत्नागिरी परिसरातील विविध शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, बचतगट, सामाजिक संस्था, सरकारी व निमसरकारी कार्यालय पेंशनर क्लब, बँका अशा अनेक ठीकाणी सामाजिक बंधिलकी म्हणून विविध आजरविषयक माहिती व वैद्यकीय सल्ला माधवबाग क्लिनिक रत्नागिरी तर्फे मोफत दिला जातो. शिबिरे व चर्चासत्र यामध्ये अनेक वैद्यकीय तपासण्या अतिशय नाममात्र शुल्क आकारून केल्या जातात. गरजू व आर्थिक अडचण असलेल्या रुग्णांकरिता सुलभ हफ्ते उपलब्ध केले जातात.
माधवबागमध्ये हृदयरोग मुक्त भारत हे एक अभियान आहे. यामध्ये आजार बरा करण्यासोबत निरोगी आयुष्य जगण्याच्या पद्धती शिकवल्या जातात.आतापर्यंत जवळपास दहा लाखाहून अधिक हृदयरोग रुग्ण माधवबागने रोगमुक्त करून मिशन हेल्दी हार्ट हे पुढे नेले आहे. आपणही या अभियानात सहभागी व्हावे व आपले हृदय तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन डॉ. मृदुला गुजर यांनी  रत्नागिरिकरांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.