https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मालदीवच्या अध्यक्षांचे राज्यपालांकडून स्वागत

0 58

मुंबई, दि. ३ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत केले. यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी – सेट भेट दिला. औपचारिक बैठकीनंतर राज्यपालांनी राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेह भोजन आयोजित केले.

यावेळी मालदीवचे वित्तमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल व परराष्ट्र सचिव अहमद लतीफ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिर्ला समुहाचे संचालक राजश्री बिर्ला, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व पोलीस महासंचालक रजनीश सेठ प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.