Ultimate magazine theme for WordPress.

मालमत्ता कर न भरल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीतर्फे संबंधित कंपन्यांना जप्तीची नोटीस

0 20

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा, ता. उरण, जि. रायगड यांचे पुर्वीचे महसुली गाव शेवा असून शेवा हद्दीतील कंपन्यांनी केलेल्या बांधकामाचा व मोकळया जागेचा मालमत्ता कर वसुलीचा अधिकार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना आहे. त्यामुळे शेवा हद्दीतील एकून बांधकामापैकी M/S NSICT, NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्यांनी केलेल्या बांधकामावर ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ नुसार संबंधीत कंपन्यांना दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी मालमत्ता कराचे बिल व त्यानंतर दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी मागणीची रीट नोटीस बजावून ३० दिवसांची मुदत दिलेली होती.
ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी मालमत्ता कर वसुली संदर्भात केलेल्या कारवाईवर M/S NSICT, – NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्याकडून ग्रामपंचायतीने दिलेल्या मुदतीत संबंधीत कंपन्यांनी मालमत्ता कराची रक्कम ग्रामपंचायतीमध्ये जमा न केल्याने व त्यासंबंधी कोणतेच समाधान कारक उत्तर न दिल्याने ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी  मालमत्ता कर वसुली संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ नुसार दिनांक ०५ जुलै २०२२ रोजी M/S- NSICT, NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्यांवर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस दिलेली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.