Ultimate magazine theme for WordPress.

मासे पकडण्यासाठी गेलेल्या पागोटेतील स्वप्नील पाटील याचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू

0 64

उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक 22/5/2022 रोजी उरण तालुक्यातील खोपटे खाडीजवळ पाच तरुण  एंजॉय करण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी गेले असता पार्टी संपल्या नंतर खोपटे खाडीतील छोट्या होडी ने फिरण्याचा मोह झाला ते होडीत बसून ते मनसोक्तपणे  फिरू लागले मात्र काही अंतरावर होडी गेल्यानंतर ती होडी लाटांच्या तडाख्यात सापडली व त्या होडीचा बॅलन्स बिघडला. समुद्राचे पाणी होडीत शिरू लागलं आणि अचानक ती होडी पलटी झाली. होडी मध्ये बसलेल्या पाचही मित्र पाण्यात पडले. ज्याचा तो आपलं जीव वाचण्यासाठी धडपड होता मात्र स्वप्निल चंद्रकांत पाटील, अविवाहित,वय वर्षे 28 राहणार पागोटे हा सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता.परंतु पोहता पोहता त्याला दम लागला. तो आपल्या मित्रांना आवाज देत होता पण त्याचा आवाज मित्रांपर्यत पोचला नाही आणि क्षणार्धात स्वप्नीलचा त्या घटनास्थळी मृत्यू झाला.
विजय रामकृष्ण पाटील (पागोटे ), शुभम नरेश पाटील (पागोटे ), महेश जगनाथ म्हात्रे (खोपटे ), राकेश बाळाराम अहिरे (शिरवणे, नेरुळ, नवी मुंबई ), स्वप्नील चंद्रकांत पाटील( पागोटे )असे पाच मित्र खोपटे खाडी येथे एकत्र आले. ते एन्जॉय करण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी एकत्र आले होते. बोटीच्या साहाय्याने खाडीत गेले असता बोट पल्टी झाली. यामध्ये पाच पैकी चार जण वाचले व एकाच दुर्दैवी मृत्यू झाला. उरण तालुक्यातील पागोटे गावातील स्वप्नील चंद्रकांत पाटील, अविवाहित,वय वर्षे 28 याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सदर घटना रविवार दिनांक 22/5/2022 रोजी दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.स्वप्नील पाटील यांच्या मृत्यूने पाटील परिवार, पागोटे गावातील ग्रामस्थांमध्ये दुःखकळा पसरली आहे.सदर घटनेची, मृत्यूची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.