मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गात आजपासून टोलवसुली
कामे प्रलंबित असतानाही टोवसुलीची अंमलबजावणी
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रलंबित असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका शुक्रवारपासून (दि. २७) सुरू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असताना टोल नाका सुरू होत असल्याने सिंधुदुर्गातील जनता आश्चर्य व्यक्त करत आहे.
आज शुक्रवार, दि. २७ मेपासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरू करण्यात येत असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून देण्यात आली.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग ६६ ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. दुचाकी व तीनचाकी गाडय़ांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. तसेच फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे.