रत्नागिरी : सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी सुरु असून परशुराम घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता मोठया प्रमाणात असल्याने दरडी कोसळून जिवीत हानी होवू नये म्हणून 06 जुलै 2022 पासून 09 जुलै 2022 पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी, चिपळूण यांनी पारित केलेला आहे. परशुराम घाटातील वाहतुक बंद असलेने सदर महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे.
उपविभागीय दंडाधिकारी खेड राजश्री मोरे, यांनी आदेशित केले आहे की महामार्गावरील वाहतुक सोयीसाठी चिपळूण कडून खेडकडे येणा-या हलक्या वाहनांसाठी कळंबस्ते-आंबडस-शेल्डी-आवाशी व चिपळूणकडे जाणा-या हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता पिरलोटे-चिरणी-आंबडसफाटा – कळंबस्तेफाटा अशी एकेरी वाहतूक करणेसाठी मार्ग निश्चित करणेत आलेले असुन वरीलप्रमाणे वाहतुक 07 जुलै 2022 ते 09 जुलै 2022 पर्यंत सुरु ठेवण्यात यावी. उपविभागीय दंडाधिकारी चिपळूण, उपविभाग चिपळूण यांचेकडील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत पुढील आदेश प्राप्त झालेनंतर वाहतूक पूर्ववत करणेसाठी पुढील निर्णय घेणेत येईल असेही आदेशात नमूद केले आहे.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |
Next Post