Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे एसटी-कारमध्ये धडक ; अमरावतीचे दोघे जखमी

0 45

नाणीज : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा पयेथील उतारावर एसटी. बस व कारची जोरदार धडक होऊन कारमधील दोघे जखमी झाले. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातील बस गणपतीपुळे येथून इस्लामपूरच्या दिशेने चालली होती. (क्र. एमएच 14 बीटी 0963) याचवेळी कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने स्विफ्ट कार (एमएच03 ए एम0613) चालली होती. हातखंबा येथील पोलिस मदत केंद्राजवळील उतारावर सकाळी दहाच्या दरम्यान भरधाव वेगाने चाललेल्या कारने समोरून येणार्‍या एसटीला जोरदार धडक दिली. धडकेमध्ये कार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली.
या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यामध्ये ललिता रामदास माहुरे (82) व किरण रवी माहुरे (45. दोघे रा. अमरावती) या दोघांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथे कार्यरत मोफत रुग्णवाहिकेने तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. रुग्णवाहिका तत्काळ दाखल झाल्याने या जखमींवर उपचार त्वरित करता आले. एस टी बस इस्लामपूर डोपोची आहे. शामराव नामदेव बनसोडे त्यावर चालक होते. अपघातामुळे
काही काळ येथील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हातखंबा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन वाहतूक पूर्ववत केली. कारमध्ये अडकलेल्या जखमींना स्थानिकांनी तातडीने बाहेर काढले


हातखंबा : मुंबई गोवा महामार्गावर पोलिस मदत केंद्राजवळ सोमवारी झालेल्या अपघातातील एसटी बस व उलटलेली कार.
(छाया : राजन बोडेकर )
Leave A Reply

Your email address will not be published.