https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई भाजपा व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघातर्फे भव्य-दिव्य ‘गणेशोत्सव स्पर्धा २०२२’ चे आयोजन

0 41

मुंबई, २९ ऑगस्ट २०२२ : कोरोना काळानंतर पुन्हा नव्या उत्साहाने सणवार साजरे करणाऱ्या गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबई भारतीय जनता पार्टी व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघातर्फे गणेशोत्सव २०२२ या  भव्य गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दिली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारोह पार पाडणार असल्याचेही आ. लाड यांनी सांगितले

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय, कोकण विकास आघाडी मुंबईचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनौबत व प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण आदी उपस्थित होते.

आ. लाड यांनी सांगितले की,  भाजपा व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघातर्फे गणेशोत्सवामध्ये तीन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. सर्वोत्कृष्ट  मूर्ती, सर्वात्कृष्ट सजावट-देखावा व स्वच्छ परिसर अशा स्वरूपाच्या या स्पर्धा आहेत. प्रत्येक स्पर्धेतील  प्रथम विजेत्यांना ३ लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे.     दुसऱ्या क्रमांकांच्या विजेत्यांना १ लाख ५० हजार  व तिसऱ्या क्रमांकांच्या विजेत्यांना ७५ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येईल.                                                                                                                                                                        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व ट्रॉफीही  विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धेकांना दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी २४ परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहितीही  आ. लाड यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.