मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. १८ :- ‘आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
‘मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायम स्वरुपी रुंजी घालत राहील. ज्येष्ठ गायक, गझलकार भुपिंदर सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.