Ultimate magazine theme for WordPress.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली

0 21

मुंबई, दि. 9 : मराठी रंगभूमी,  चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे शोकसंदेशात म्हणतात, ‘रंगभूमी, चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनामुळे एक सदाबहार, उमदा कलावंत मराठी कलासृष्टीने गमावला आहे. या गुणी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave A Reply

Your email address will not be published.