मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मुंबई, : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार सर्वश्री दादाजी भुसे, संदिपान भुमरे, संजय राठोड, भरत गोगावले, दीपक केसरकर, संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवरानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.