मोफत वैद्यकीय शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण पोलीस ठाणे, मोरा सागरी पोलीस ठाणे, लायन्स क्लब ऑफ उरण, उरण डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी कर्मचारी,मच्छिमार बांधव, सागर रक्षक दल, ग्राम रक्षक दल, पोलीस पाटील यांच्याकरिता तेरापंथी सभागृह वाणीआळी उरण शहर येथे दिनांक 7/6/2022 रोजी दुपारी 2 ते 5 या दरम्यान वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
सदर शिबिराचे उदघाटन न्हावा शेवा पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी केले.यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग सुहास चव्हाण,लायन्स क्लब ऑफ उरण चे अध्यक्ष लायन नरेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष लायन सदानंद गायकवाड, सेक्रेटरी लायन नीलिमा नारखेडे, लायन चंद्रकांत ठक्कर,लायन डॉ प्रीती गाडे, लायन संतोष गाडे, लायन अमोल गिरी, लायन प्रमिला गाडे, लायन डॉ भक्ती कुंदेलवार, लायन डॉ पंकज पाटील, लायन उत्तरा रुईकर,उरण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश गिरी, सेक्रेटरी डॉ अमोल गिरी, कोषाध्यक्ष डॉ सचिन चव्हाण, सांस्कृतिक सेक्रेटरी डॉ ग्रीष्मा, सदस्य डॉ सविता गिरी, सदस्य आकाश भारती, सदस्य अमोल गिरी, तसेच डॉ भालचंद्र नाखवा, डॉ अनिता कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी त्वचारोग, दंतरोग, स्त्री रोग, अस्थीरोग, हृदयरोग, नेत्र रोग आदी विविध रोगाशी संबंधित तपासणी पोलीस कर्मचारी, सागरी सुरक्षा दल, मच्छिमार बांधव, ग्राम रक्षक दल, पोलीस पाटील यांनी करून घेतल्या.यावेळी ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, इसीजी आदी तपासण्याही मोफत करण्यात आले.
सदर वैद्यकीय तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी उरण पोलीस ठाणे, मोरा सागरी पोलीस ठाणे, लायन्स क्लब ऑफ उरण, उरण डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.