Ultimate magazine theme for WordPress.

यमूना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उलवे येथे दहिहंडी उत्साहात साजरी

0 14

उरण दि. 20( विठ्ठल ममताबादे ) : यमूना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उलवे नोड येथे “भव्य दहिहंडी उत्सव 2022” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर,पनवेल म न पा चे विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे, साई देवस्थानचे विश्वस्त रवीशेठ पाटील, जिल्हा परिषद सद्स्य रवीशेठ पाटील, कमलाकर घरत, अखलाक शिलोत्री, मार्तंड नाखवा, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महिला अध्यक्षा योगिता नाईक,उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे , किरिट पाटील,महेंद्र मुंबईकर, बापु मोकल, संजय ठाकूर, यशवंत घरत,विनोद पाटील,भालचंद्र घरत,शंभो म्हात्रे,पनवेल तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष कमालसन, उलवे नोड काँग्रेस अध्यक्ष आर आर सिंग,रायगड जिल्हा युथ अध्यक्ष निखिल डवले, प्रशांत खाणे, सागर सुखदरे, कर्जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय गवळी, न्हावे गावचे माजी सरपंच किसन पाटील, के. डी कोळी, नंदा कोळी,गव्हाण च्या सरपंच माई भोईर,गव्हाणचे माजी उपसरपंच अरुण कोळी,अश्विन नाईक, किरण पाटील, अनिलशेठ घरत, रमेशशेठ घरत आदी मान्यवर उपस्थित होते.दहीहंडीसाठी 5 लाख 55 हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती.52  संघानी(गोविंदा पथकांनी )या दहिहंडीत सहभाग घेतला. कामगार नेते तथा रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतत्वाखाली उलवे येथे आयोजित केलेल्या हहिहंडी स्पर्धेचा गोविंदा पथकाने पूरेपूर फायदा घेतला.सदर दहीहंडी ‘मंडळा गाव मुंबई’ या मुंबईच्या गोविंदा पथकाने फोडली.गोविंदा पथकाचा उलवे येथील दहीहंडीला  उत्तम प्रतिसाद लाभला आहे. असे काँग्रेसचे पदाधिकारी तथा NMGKS चे सरचिटणीस वैभव पाटील यांनी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.