यवतमाळ, नंदूरबार व मालेगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई,: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार राज्यातील तीन जिल्ह्यांच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदांच्या जागी प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी एजाज बेग अजिज बेग, नंदूरबार जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी आ. शिरिषकुमार नाईक, तर यवतमाळ जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी ऍड. प्रफुल्ल खुशालराव मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.