उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आलिमघर गाव येथील एक तरुण कलाकार अगदी कमी वेळात नावारुपाला आला. युट्यूब ,इन्स्टाग्राम ,मोज,फेसबुक,शेअर चॅटच्या माध्यमातून तो आज घराघरात पोहोचला. त्या तरुण कलाकाराच नाव आहे आगरीकोळी समाजातील ऑल राउंडर आगरी कोळी कलाकार जयेश पाटील. त्याने सामाजिक व सांस्कृतिक विषयावर व्हिडीओ तयार करून आपली कला सादर करत आपल्या संस्कृतीला सातासमुद्रापार नेले.
नुकताच पनवेल येथील आई एकविरा वर आधारित लघुचित्रपट ती पाठीशी आहेचे दिग्दर्शक व माझं शंभूराजं या गाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक तेजस पाटील यांच्या एकविरा कला संस्थेच्या दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली या कार्यक्रमात जयेश पाटील याचा कला सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.