यूपीएससीत रत्नागिरी जिल्ह्यातील दोघे चमकले!
रत्नागिरी : खेड तालुक्यातील तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय संजय महाडिक तसेच रत्नागिरीच्या चेतन पंदेरे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे यात अक्षयने देशात 212 वी तर रत्नागिरीच्या चेतन पंदेरे याने 416 व रँक मिळवली आहे.
तालुक्यातील सर्वसाधारण कुटुंबातील अक्षय संजय महाडीक याची आई सौ.नेहा संजय महाडीक खेडमधील नातूनगर येथील जि.प.शाळेत प्राथमिक शिक्षिका असून व वडील संजय महाडीक हे कृषी विभागात कार्यरत आहेत. त्याचे मुळगाव दापोली तालुक्यातील माटवण आहे. अक्षय याचे बारावी पर्यंत शिक्षण खेडमध्ये झाले आहे. शैक्षणिक वाटचालीत यापूर्वी अक्षय याने कोकण बोर्डातून इयत्ता दहावी व बारावी विज्ञान पर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या विद्यालयात पूर्ण केले आहे.
रत्नागिरीच्या चेतन पंदेरे या मुलाने या परीक्षेत बाजी मारली आहे. या निकालात चेतन पंदेरे याला 416 व रँकिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे पोलिस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणार्या नितीन पंदेरे यांचा मुलगा असून त्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पोलिस खात्यात काम करणार्या कर्मचार्याच्या मुलाने यूपीएससी मध्ये यश मिळवण्याची कोकणातील ही पहिलीच घटना आहे. युपीएससी परीक्षेमध्ये चेतन पंदेरे यांला 416 व रँकिंग मिळाले आहे.