रत्नागिरीचे डॉ. विवेक भिडे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड परीक्षेच्या भारतीय चमूचे संघप्रमुख
डॉ. विवेक भिडे गोगटे -जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक
रत्नागिरी : शास्त्र शाखेच्या विविध आंतर राष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. भौतिकशास्त्र विषयाचे यजमान पद भूषविणार्या फिजिक्स असोसिअशन ऑफ स्वित्झर्लंड यासंस्थेने या वर्षी भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा घेतली. यामध्ये भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले. मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था येथून ऑनलाइन पद्धतीनेया स्पर्धेत भारतीय विद्यार्थी संघ सहभागी झाला होता.
भारतभरातून विविध चाचणी परीक्षातून अंतिम निवड झालेल्या पाच जणांच्या विध्यार्थी संघाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेसाठी होमी भाभा संस्थेत प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. विवेक भिडे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले तसेच आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी विद्यार्थी संघाचे नेतृत्वही केले. त्यांच्या नेतृतवाखालील या संघाने एक सुवर्ण आणि चार रौप्य पदके मिळवून भारतीय संघाची
ऑलिम्पियाड परंपरा प्रतिवर्षाप्रमाणे कायम राखली.
विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या डॉ. भिडे यांचे र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि सहकारी
प्राध्यापक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.