रत्नागिरीच्या लक्ष्मी मंदार ढेकणे सव्वा लाखाच्या पैठणीच्या मानकरी !
झी वाहिनीवर उद्या प्रक्षेपण होणार!
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे (रा. खालची आळी, रत्नागिरी) या ‘झी मराठी’ वाहिनीवरील महा मिनीस्टर कार्यक्रमात रत्नागिरी केंद्राच्या सव्वा लाखाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
झी मराठीकडून महाराष्ट्रातील १० केंद्रावर निवड प्रक्रिया करण्यात आली. सावरकर नाट्यगृह येथे दि २२.मे रोजी पार पडलेल्या निवड प्रक्रियेमध्ये प्रश्न फेरीत अचूक उत्तरे दिलेल्या वहिनींमधून नव्वद जणींची चिठ्ठ्या काढून निवड करण्यात आली आणि आदेश भावोजींनी या नव्वद जणींना “माहेरवासासाठी मुंबईला या ‘असे निमंत्रण दिले. २४ मे रोजी झी मराठीच्या दोन वातानुकुलीत आराम बसमधून अनोख्या अनुभवासाठी सर्व मैत्रिणी धम्माल करत निघाल्या. मुंबईत 3 स्टार हॉटेल मध्ये राहण्याची , नाष्टा, जेवणाची, प्रवासाची उत्कृष्ट सोय केली गेली. ट्रॉम्बे येथे essel स्टुडिओमध्ये शुटींग हा प्रत्येकीसाठी अविस्मरणीय व नवीन अनुभव होता.
यात नव्वद स्पर्धकांमधून खेळ खेळून १५ स्पर्धक निवडले गेले.
5-5जणीचे 3 ग्रुप करून – खेळाद्वारे 10 जणीची निवड झाली आणि या १० जणींमध्ये प्रश्नोत्तर फेरीतून 5 जणी निवडल्या गेल्या. प्रिया मनोरकर, वरदा मुळ्ये, रश्मी गुरव, अपूर्वा पवार व लक्ष्मी ढेकणे यांचा समावेश होता.
या 5 जणींमध्ये अंतिम सामना रंगला आणि त्यात रत्नागिरी च्य सौ लक्ष्मी मंदार ढेकणे या विजयी होऊन सव्वा लाखाच्या पैठणीच्या व सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या. त्याचे प्रक्षेपण रविवार दि. 5 जून रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत झी मराठी वहिनी वर होणार आहे.