Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीत उद्या सकाळी सायकल प्रसार फेरी

0 63

रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे आयोजन

रविवारी सकाळी ६ वाजता.मारुती मंदिर येथे शुभारंभ

रत्नागिरी : शहर परिसरात सातत्याने सायकलिंगचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी 22 मे रोजी सकाळी 6 वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी सायकलींग क्लब तर्फे येत्या कॅलेंडर वर्षात 1 लाख किलोमीटर सायकलिंग करण्याचं उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दर दोन महिन्यांनी एक मोठी 100 किलो मीटर ची ग्रुप राईड, दर 15 दिवसांनी एक 50 किलोमीटरची ग्रुप राईड रत्नागिरी सायकलिंग क्लब तर्फे केली जाते.

दरम्यान, येत्या रविवारी 22 मे रोजी सकाळी 6 वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे मारुती मंदिर -फिनोलेक्स कॉलनी-मिऱ्या- गाडीतळ -टिळक आळी -मांडवी-आठवडा बाजार-जयस्तंभ – माळनाका – मारुती मंदिर अशा शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी हेल्मेट आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन या सायकल रॅलीमध्ये मारुती मंदिर येथे सकाळी 6 वाजता सहभागी व्हावे,
तसेच 14 वर्षाखालील सायकलप्रेमींनी आपल्या पालकांसह या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.