रत्नागिरीत महसूल दिन कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव
सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील
रत्नागिरी दि. ०२ : महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार खाते आहे. सर्व लोकांच्या जीवनाला स्पर्श करणार खात आहे. विविध कामांसाठी नागरिक आणि शेतकरी आपल्याकडे मोठया अपेक्षेने आपली गाऱ्हाणी घेऊन येत असतात ती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यासपूर्ण व नियमामध्ये राहून सोडवून नागरिकांमध्ये महसूल विभागाबद्दलचा
असलेल्या विश्वास वाढवाल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.
अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथील महसूल दिनानिमित्त सन 2021-22 या महसूली वर्षामध्ये आपली जबाबदारी व कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, इन्दुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ,मोहितकुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांतधिकारी विकास सुर्यंवशी, प्रांतधिकारी प्रवीण पवार,जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्पर्श करणारा असल्याने आपल्याला वेगवेगळया माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे . त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियमात राहून व अभ्यासपूर्ण सोडवा. आहे ते कामात अधिक प्रगती साधत विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा. यासाठी सर्वांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून एकत्रित काम करा असे ते म्हणाले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होते. प्रत्येक विभागात रांगोळ्यांसह सुशोभिरण करण्यात आले होते. महसूल कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातून शासकीय योजनांची प्रसिद्धीही करण्यात आली होती. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूल विभाग आणि जिल्हा रूग्णालय यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच घरोघरी तिरंगा मोहीमेचाही यानिमित्ताने प्रचार करण्यात आला. महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील स्वतंत्र तलाठी कार्यालयाचे उद्घाटनही जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयासमोर जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले