Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा इशारा

0 45

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 10
जून 2022 ते  12 जून 2022 या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र समुद्रकिनाऱ्यापासून 75 कि.मी. अरबी समुद्रामध्ये ताशी
40-50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आलाला असून मच्छीमारांनी संबधित
कालावधीत समुद्रात जावू नये असा इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
तसेच 9 जुन ते 12 जुन 2022 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयातील काही ठिकाणी ताशी 40-50 कि.मी.
वेगाने वादळी वारा व विजेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तरी संबधीतांना
सावधानता व सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.