रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने १२ व १३ जुलै २०२२ रोजी मनोरुग्णांचे आधार कार्ड काढणेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करणेत आले आहे.
या कालावधीमध्ये ज्या मनोरुग्णांचे आधार कार्ड नाही अशा सर्व मनोरुग्णांचे आधार कार्ड काढण्यात येणार आहेत. सदर शिबीर जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात
येत आहे. शिबीराला निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार प्रकल्प सुशांत खांडेकर यांनी प्रत्यक्ष भेट दिली व मार्गदर्शन केले. यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोद गडिकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग यशवंत चौगले, जिल्हा समन्वयक, महाआयटी मयूर आयरे, वरिष्ठ साहाय्य अभियंता, मा.तं.वि. राहुल कांबळी रत्नागिरी आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी उपवैद्यकिय अधिक्षक डॉ अमित लवेकर, अधिसेविका अश्विनी शिंदे, समाजसेवा अधिक्षक नितीन शिवदे, कार्यालयीन अधीक्षक कोळी प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.