Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न : नीलेश राणे

0 52

फुकटचे श्रेय लाटणाऱ्या खासदारानी दुर्लक्ष केल्याचा आरोप

रत्नागिरी : चिपीप्रमाणेच रत्नागिरी विमानतळ सुरु करणे हे महत्वाचे आहे. विद्यमान खासदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातूरत्नागिरी विमानतळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.

गेली अनेक वर्ष प्रवासी वाहतूकीची प्रतीक्षा करणाऱ्या रत्नागिरी विमानतळबाबत खासदार विनायक राऊत केवळ घोषणा करताना दिसतं आहेत, मात्र तो सुरु व्हावा यासाठी त्यांच्याकडून किंवा उत्तर रत्नागिरीचे खासदार sunil तटकरे यांच्याकदम काहीच पावले उचलली जात नाहीत. याकडे लसख वेधतानाच निलेश राणे यांनी हा विमानतळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

खा. विनायक राऊत यांच्या कार्य पद्धतीवर सडकून टीका करतानाच निलेश राणे म्हणाले की,

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने सुरु झाले. आणि ते चांगलं सुरू आहे. सामान्य लोकांची ये-जा तिथून आहे आणि जास्त करून त्या विमानाचा प्रवास स्थानिक लोक करतात या गोष्टीचा समाधान आहे. सामान्य सिंधुदुर्ग वासियांना याचा उपयोग व्हावा या संकल्पनेतून राणे साहेबांनी एअरपोर्टसाठी प्रयत्न केले आणि ते पूर्ण सुद्धा केले.हाती घेतले होते राणीसाहेबांनी त्याच दिशेने वाटचाल होते या गोष्टीचा आनंद आहे.

पण दुसऱ्या बाजूला रत्नागिरी एअरपोर्ट होताना दिसत नाही. कोस्ट गार्ड कडे हे विमानतळ सध्या आहे. मात्र येथेही प्रवासी वाहतूक सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी कोणते प्रयत्न सुरु आहेत, जामीन अधिग्रहणचे काम पूर्ण झाले का? किती काम झाले, एअरपोर्ट सुरु करण्याची रूपरेषा काय आहे हे अजून पर्यंत खासदार विनायक राऊत कधी बोलताना दिसत नाही. राणे साहेबांमुळे सुरु झालेल्या चिपी विमानतळचे श्रेय घेण्यासाठी खा राऊत तिथे आघाडीवर होते. पण रत्नागिरी मध्ये काय चाललंय, हे विमानतळ कधी सुरु होणार यावर बोलताना खासदार दिसत नाही. रत्नागिरी एअरपोर्ट साठी आपण कुठली पावले उचललेली आहेत किंवा नेमकं एअरपोर्ट सुरू होणार आहे का नाही हे स्थानिक जनतेला कळले पाहिजे. त्याच्यासाठीच खासदार काय करणार आहे की नाही हे विचारण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी हा महत्त्वाचा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट सगळ्यांची मागणी आहे तरीही खा. राऊत किंवा खा. Sunil तटकरे बोलताना दिसतं नाही. नाही आणि जिथे झाला तिकडे तिकडेतोंड झालेला कुणीकडे जिथे मागणी आहे लोक वाट बघत आहेत तिकडे खासदार विनायक राऊत का बोलायला तयार नाही किंवा खासदार जिल्ह्याचे काय बोलायला तयार नाही लोकांना सांगा पोट कधी येणार आणि

मात्र आता रत्नागिरीचे विमानतळ लवकरत लवकर सुरु होण्यासाठी आम्ही राणे साहेबांना सांगून तो प्रयत्न सुरू करतोय. खासदारांकडून काय होईल असे वाटतं नसल्याई आता येणाऱ्या काळामध्ये तो प्रयत्न आम्ही करणार असून राणे साहेबांना सांगून तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी चा विमानतळ प्रवशी वाहतूकीसाठी सुरु करण्याची मागणी राणे साहेबांकडे लवकरात लवकर करणार आहोत अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.