रत्नागिरी विमानतळावरून वर्षखेरपर्यंत विमान सेवा : सुरेश प्रभू
रत्नागिरी : गेली काही वर्षे राखडलेल्या रत्नागिरी विमानतळवरून या वर्षअखेरीस विमान वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती प्रभू यांनी दिली. या विमानतळामुळे पर्यटनच नव्हे तर रत्नागिरी शहराबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचे उंची देशभरात वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारत सरकारचे शेर्पा, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासमवेत अधिकारी गुहागरचे माजी आ. डॉ. विनय नातू उपस्थित होते. रत्नागिरी विमानतळासाठी ते अधिक प्रयत्नशील असल्याचे प्रभू यांनी सांगितले. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन विमानतळ सुरू होण्यासाठी मी तेव्हा खूप प्रयत्न केले होते. त्यातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे तेव्हा भूमिपूजन करून उद्घाटनही झाले आहे.
यावेळी श्री. प्रभू म्हणाले की, जिल्हाधिकारी डॉ. पाटील हे अत्यंत कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख काम करीत आहेत. या विमानतळासाठी तेव्हा फक्त एकच अडचण होती की, रत्नागिरी विमानतळ हे कोस्टगार्डच्या ताब्यात आहे. त्यावेळी प्रभू यांनी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद करण्यासाठी सांगून तशी तरतूद करायला भाग पाडले. विमानतळाला जागा कमी पडत होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती जागाही 11 वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी काही सूचनाही केल्या. त्यामध्ये हवाईपट्टा, धावपट्टी वाढवण्याचा समावेश आहे.