Ultimate magazine theme for WordPress.

राज्यभर नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

0 53

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या मागण्या मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.1 मे 2022 रोजी कामबंद आंदोलनाचा पहिला दिवस आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदेचे तसेच नगर पंचायतचे अधिकारी कर्मचारी वर्ग या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली आहे.

विविध मागण्यासाठी संपूर्ण राज्यातील व उरण नगर परिषद मधील अधिकारी/ कर्मचारी वर्गांनी पहिल्या टप्प्यात एकत्र येत मागण्या बाबत दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी काळ्या फिती लावून निदर्शने केली तसेच दिनांक20 एप्रिल2022रोजी आझादमैदान ते मंत्रालय भव्य मोर्चा काढण्यातआला.तरी देखील शासनाने दुर्लक्ष केल्याने दिनांक 1 मे 2022 पासून अत्यावश्यक सेवांसाहित काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत/संवर्ग कर्मचारी करत आहेत.असे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी माहिती दिली.राज्यउपाध्यक्ष प्रदीप रावनकर, राज्यसरचिटनिस रामेश्वर वाघमारे, राज्यकोषाध्यक्ष अनिल पवार, राज्य कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ घुगे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव यांनी माहिती दिली.उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष गुडेकर, सचिव संजय पवार, सहसचिव आकाश कवडे, खजिनदार संजय दाते, सहखजिनदार रमेश सरवदे, कार्याध्यक्ष नितीन कासारे, सह कार्याध्यक्ष नितीन कांबरे, संघटक अनिल जगधणी, झुंबर माने, महिला संघटक सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनीषा उमते, भारती करंगुटकर, रशिदा शेख, कांचन तारेकर, सल्लागार झुंबर माने, राजेश कदम, संजय डापसे, हरेश तेजी, जयराम पाटील, विजय पवार, धनेश कासारे, सचिन भानुसे, संतोष कांबळे, संजय परदेशी,रमेश सरवदे,प्रमोद मटकर, अनिल कासारे आदी उरण नगर परिषदेचे कर्मचारी या संपात, काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राज्यातील दोन लाखावर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी यांचे राज्यात सर्वत्र बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे.प्रलंबित मागण्याबाबत प्रदीर्घ काळापासून सरकार तोडगा काढत नसल्याने कर्मचारी संघटनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.महाराष्ट्रातील 369 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतीचे दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत .महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने व कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केला आहे.

कामगारांच्या मागण्या :-

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागार मार्फत मिळावे, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदान ऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे ,दहा- वीस -तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची तीन हप्ते मिळावेत, नव्याने झालेल्या नगरपंचायत येथील सफाई कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विनाअट समावेशन करावे, सर्व नवीन नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांची आकृतिबंध यामध्ये पद निर्मिती करावी ,सेवेत असताना मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने किंवा अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती द्यावी, नगर परिषदेचे थकित सहाय्यक अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कायदेशीर देणी एकरकमी द्यावीत तसेच दरमहा निवृत्ती वेतन एक तारखेला द्यावे, हंगामी व ठेकेदार कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे वेतन मिळावे तसेच सर्व कायदेशीर लाभ मिळावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.