Ultimate magazine theme for WordPress.

रायगडमध्ये द्रोणागिरी किल्ल्यावर सापडले मानवी मृत शरीराचे अवयव

0 46

माहिती मिळताच उरण पोलीस घटनास्थळी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचे आयोजन करण्यात येते. मोहिमेच्या माध्यमातून गडावर /किल्ल्यावर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. रविवारी दि 15 मे 2022 रोजी शिवराज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पदाधिकारी सदस्यांनी द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचे आयोजन केले होते. किल्ल्याजवळ असलेले पाण्याचे हौद साफसफाई करताना शिवराज युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी सदस्यांना हौदात एका मृत व्यक्तीचे डोक्याची कवटी, हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे अवशेष, अवयव दिसताच शिवराज युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सदर माहिती उरण पोलीस स्टेशनला कळविली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील सदर घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी मृत व्यक्तीचे अवशेष, हाडे कवटी इत्यादी अवयव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.सदर मृत व्यक्ती कोण आहेत. तिचे मृत्यू कधी झाले. द्रोणागिरी किल्ल्यावर पाण्याच्या हौदात ती कशी पडली आदी गोष्टीचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.