राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. रामास्वामी एन. नोडल अधिकारी
मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी दि. 18 रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता डॉ. रामास्वामी एन., आयुक्त (कु.क.) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील कोविड महामारीच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेवून राष्ट्रपती निवडणूक आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाने शासनास नोडल अधिकारी नेमण्याची विनंती केली होती, त्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.