उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उरण तालुका व गुरुकूल अकॅडमीच्या वतीने दरवर्षी उरण शहरात दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 2 वर्षाच्या कोरोनानंतर आता दहीहंडी साजरी होत असल्याने दहिहंडी उत्सवाला यात्रेचे स्वरूप आले होते. उरण शहरातील पालवी हॉस्पीटल, वादळवारा चौक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राघोबा गोविंदा पथक कोटनाका यांनी 7 थर लावून सलामी दिली तर जरीमरी गोविंदा पथक नागाव यांनी 6 थर मारून सलामी देत दहिहंडी फोडली. यावेळी गोविंदा पथकासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी यावेळी बेभान होऊन डान्स केले.
यावेळी आयोजक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक प्रशांत बाळकृष्ण पाटील (भाऊ),महाराष्ट्र सरचिटणीस भावना ताई घाणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर,राष्ट्रवादी काँग्रेस उरण तालुकाध्यक्ष मनोज भगत,शहर अध्यक्ष गणेश नलावडे( नाना),युवा अध्यक्ष कैलास मोरेश्वर भोईर, उपाध्यक्ष रायगड जिल्हा एडवोकेट भार्गव पाटील,सरचिटणीस रायगड जिल्हा दिपक माळी, सरचिटणीस पुष्कराज सुतार, उरण तालुका अध्यक्ष हेमांगी पाटील,शहर अध्यक्ष संध्या घरत, ओबीसी शहर अध्यक्ष मंगेश कांबळे, युवक शहराध्यक्ष सनी म्हात्रे, तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर, चाणजे अध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते समीर सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |