Ultimate magazine theme for WordPress.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी कुंदा ठाकूर

0 42

उरण ( विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या व महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या तसेच राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी या प्रमुख राजकीय पार्टीच्या रायगड जिल्हा महिला सरचिटणीस पदी कुंदा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
सुतारवाडी,तालुका रोहा  येथील खासदार सुनिल तटकरे यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या कार्यक्रमा दरम्यान उरण तालुक्याचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्याची माहिती खासदार तटकरे यांनी दिली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते कुंदा ठाकूर यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंढे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार जिल्हयातील महिलांना विविध पदे देण्यात आल
यावेळी सुनिल तटकरे खासदार रायगड लोकसभा मतदार संघ,  नामदार आदितीताई सुनिल तटकरे राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा,अनिकेत भाई तटकरे आमदार- स्थानिक स्वराज्य संस्था,उमाताई मुंडे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा, वैजनाथ ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य, विशाल पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.कुंदा ठाकूर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला रायगड जिल्हा सरचिटणीसपदि निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.