Ultimate magazine theme for WordPress.

रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचा वहाळ साईनगर येथे कार्यक्रम

0 21

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रोटरी क्लब ऑफ उलवे नोड Installation Ceremony 2022-23 हा कार्यक्रम साई मंदिर, साई नगर वहाळ येथे  दिनांक 10 जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 2023-24 च्या DG मिस. मंजू फडके,  AG डॉ.प्रकाश पाटील, रोटिरियन विष्णू म्हात्रे तसेच इतर मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.

कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदना करून झाली. आषाढी एकादशनिमित्त नवजीवन इंटरनॅशनल स्कूल वहाळ च्या  शाळकरी मुलांनी अवघी पंढरी डोळ्या समोर उभी केली.ह्या उपक्रमात माजी प्रेसिडेंट शिरीष कडू यांनी मागील दोन वर्षात राबवलेल्या  विविध उपक्रमांचा आढावा मान्यवरांना दिला आणि सन 2022-23 साठी प्रेसिडेंट म्हणून  Rtn निलेश सोनावणे आणि सचिव म्हणून Rtn  अमित कुचेकर ह्याच्या हाती कार्यभार सोपविला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन Rtn. रेखा चीर्णेरकर यांनी केले.  या वेळी BOD member.  Rtn सचिन मोरे, Rtn  नितीन आढाव, Rtn निलेश ठाकूर, Rtn निंबाळकर, Rtn अजय दापोलकर, Rtn चंद्रकांत खरे, Rtn श्रद्धा मॅडम., Rtn अतुल आढाव, Rtn जयंत म्हात्रे आणि रोटरीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.