लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी उरणचा पदग्रहण सोहळा संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील भोईर गार्डन येथे लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी उरण चा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक गव्हर्नर पि. एम.जे. एफ लायन तावरी, डिस्ट्रिक गव्हर्नर अमरचंद शर्मा, रिजनल चेअर पर्सन लायन ज्योती देशमाने, इ .एक्स.टी चेअर पर्सन गौरी देशपांडे, लायन्स क्लब उलवे जेम्सचे अध्यक्ष मिलिंद पाटील आणि सभासद, लायन्स क्लब द्रोणागिरी चे सर्वं लिओ सभासद, लायनस क्लब आँफ द्रोणागिरी चे पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते.
ढोल ताशाच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाले. त्यानंतर गौरी देशपांडे यांनी उरणला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक वातावरण, व उरण शहराचे औद्योगिक महत्व सूत्रसंचालन करताना सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उलवे लायन्स क्लब च्या भगिनींनी आपल्या सुरेल गळ्यातून ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन तेथील वातावरण मंगलमय केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत झाले. डिस्ट्रिक गव्हर्नर तावरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की माझ्या साठी हा एक अविस्मरणीय क्षण ,ऐतिहासिक क्षण आहे की आज या सुंदर क्षणा़चा मी सोबती आहे ते क्षण म्हणजे द्रोणागिरी लायन्स क्लबचा आज पदग्रहण सोहळा होत आहे. यावेळी नवनिर्वाचित लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी उरण च्या लायन्सचा पदभार घेण्यापूर्वी शपथविधी झाला व त्यानंतर प्रत्येक लायन्स सभासदांस ती ती जबाबदारी व पदभार सोपविण्यात आला.
गौरी देशपांडे व राखी लोणकर यांच्या यांनी उत्तम सुत्रसंचलन केले.लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी उरणचे महत्वाचे आणि जबाबदारी चे पद म्हणजे अध्यक्षपद लायन संदीप म्हात्रे यांना देण्यात आले. त्यांनीही हे पद सन्मानाने स्विकारून नवीन पदाच्या जबाबदारी चे काम निष्ठेने आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी कटीबद्ध रहाण्यासाठीचा विश्वास दर्शविला.
लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी चे लायन अध्यक्ष संदीप म्हात्रे, सेक्रेटरी लायन मोनिका चौकर, खजिनदार लायन सुषमा काळे, लायन सागर चौकर, लायन प्रज्ञान म्हात्रे, लायन भुमीका सिंग,लायन स्नेहा नवाळे, लायन अश्विनी धोत्रे, लायन संदीप देशपांडे, लायंन कांचन आसरकर, लायन भारती दत्त,लायन दिपाली गुरव, लायन तनुजा भोईर,लायन राकेश, चोणकर ,लायन शैलेश डावरे लायन अश्विनी धोत्रे, लायन वेंडी मिरंडा, लायन रंजना म्हात्रे आदी लायन टिमने मिळालेल्या पदाचा स्विकार करून पुढील जबाबदारी घेण्यासाठीची तयारी दर्शवली. त्याचप्रमाणे जवळजवळ १५/२० अल्पवयीन मुले व मुलांनी या संस्थेच्या कार्यप्रणालीस प्रेरीत होवुन आतापासूनच समाजसेवेचे व्रत जोपासण्यासाठी तयारी दर्शवली.
लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी तर्फे घेण्यात आलेले उपक्रम म्हणजे नाईक नगर येथे पाण्याची बोअरवेल, झोपडपट्टीतील मुलांना शालेय साहित्य वाटप, नाईक नगर झोपडपट्टीतील बालवाडीत फर्स्ट एड बॉक्स, अमोल दुरूगकर यांच्या सरबत स्टॉल साठी लायन्स क्लब ची मोठी छत्री त्यावेळी देण्यात आली. लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी तर्फे सध्या चालू असलेले उपक्रम म्हणजे नाईक नगर झोपडपट्टीमध्ये दर शनिवारी दिडशे मुलांना मोफत जेवण वाटप, तेथीलच ५० मुलांना, शनिवार रविवार मोफत शिक्षण दिले जाते . त्याचप्रमाणे श्री. समर्थ मठ केगाव येथे दर गुरुवारी खिचडी वाटप करण्यात येते तसेच गोरक्षनाथ मंदिर वहाळ येथे लायन्स क्लब आँफ उलवे जेम्स आणि इतर क्लबच्या वतीने एकावेळी आठशे लोकांना जेवण दिले जाते.
नवनिर्वाचित लायन अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी भविष्यात लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी उरण च्या वतीने मोतिबिंदू कॅंम्प व आता पावसाळा सुरु झाल्यावर उरण ते नवीमुंबई परिसरात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्याचे सांगितले आहे.
लायन्स क्लब आँफ द्रोणागिरी उरण च्या लायन मोनिका चौकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे व जमलेल्या मान्यवरांचे आभार मानले.