लाल मिरची सर्वसामान्यांना झोंबणार !
पावसाळा पूर्व खरेदीवेळी दर 30 रुपयानी वाढले
रत्नागिरीः महागाईने उच्चांक गाठला आहे. पावसाळा जवळ आल्याने अगोटच्या खरेदीसाठी लगबग वाढली. सध्या लाल मिरची विकत घेण्याआधीच वाढत्या दराने सर्वसामान्यांना ठसका लागला आहे.
लाल मिरचीचे दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत तर आगामी दोन महिन्यात हे दर २००ते ६५० किलोंपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जानेवारी महिन्यापासून हिरव्या मिरचीचे उत्पादन घटल्याने लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे याचा नक्कीच ग्राहकांना सर्वसामान्याना फटका बसणार आहे.
सध्या बाजारात बेडगी मिरची ४५० ते ४६० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. गुंटूर मिरची २०० ते २३० रुपये किलो मिळत आहे. या दरात आणखी वाढ सुरूच राहणार असून पुढील दोन महिने लाल मिरचीच्या बाजारात तेजी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.