https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

लोकनेते शिक्षण महर्षी कै. तुकाराम हरि वाजेकरशेठ यांची ११५ वी जयंती उत्साहात

0 58

उरण (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वणवण फिरायला लागू नये विशेषत: महालण विभागातील कष्टकरी,शेतकरी कुटुंबातील मुला़ंनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रयत शिक्षण संस्थे मार्फत तु.ह.वाजेकर महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षणाची गंगा सर्व सामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेच्या दारात ज्यांनी ख-या अर्थाने आणली ते लोकनेते शिक्षणमहर्षी कै.तुकाराम हरि वाजेकरशेठ यांची 115 वी जयंती उरण पेठा मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण शहर येथे उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी मंडळ, उरण महाल सहकारी मजदूर संघाचे पदाधिकारी सदस्य व समस्त वाजेकरशेठ प्रेमी, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघनाथ तांडेल (उरण तालुका शेकाप चिटणीस )यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय लोकनेते वीर वाजेकरशेठ यांच्या कार्याची विचाराची ओळख उपस्थितांना करून दिली. कोणतेही अपेक्षा न ठेवता वीर वाजेकरशेठ यांनी जनतेसाठी काम केले. तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. सर्वसामान्यांना न्याय देणारे स्वर्गीय तुकाराम हरी वाजेकर (वीर वाजेकरशेठ )हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. असे मत अध्यक्षीय भाषणात मेघनाथ तांडेल यांनी व्यक्त केले. यावेळी कृष्णा कडू, रमाकांत म्हात्रे, काका पाटील, सीमा घरत, यशवंत ठाकूर आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.सीमा घरत यांनी करळ येथे बनलेल्या उड्डाणमार्गाला वीर वाजेकर शेठ यांचे नाव देण्याची मागणी केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुक्यातील चिटणीस मेघनाथ तांडेल, पंचायत समितीचे माजी सभापती महादेव बंडा,फुंडे हायस्कुलचे चेअरमन कृष्णाजी कडू, जसखार ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमाकांत म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते काका पाटील, शेकाप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सीमा घरत, शेकाप शहराध्यक्ष नयना पाटील, रायगड भूषण यशवंत ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष नहीदा ठाकूर, पागोटेचे माजी सरपंच मनोहर पाटील, शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण सुतार, सामाजिक कार्यकर्ते मंगेश वाजेकर, उरण तालुका मीठ उत्पादक सेक्रेटरी किशोर घरत, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, जेष्ठ नागरिक नारायण पाटील, मिठागार कामगार संघ अध्यक्ष बा. ध. पाटील, संचालक -उद्धव घरत, संचालक गणेश ठाकूर, संचालक हरिश्चंद्रशेठ घरत, संचालक दिलीप तांडेल, संचालक नानुराम पाटील, माजी शिक्षक गजानन कडू, सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र घरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन मुकुंद पाटील(गुरुजी )यांनी तर आभार प्रदर्शन पंचायत समितीचे माजी सभापती महादेव बंडा यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.